स्त्रियांसाठी मराठी उखाणे | Best 50+ Marathi Ukhane For Female

महाराष्ट्र राज्यात लग्न समारंभ असोत किंवा सुवासिनीचा कोणता हि कार्यक्रम असो स्त्रियांसाठी मराठी उखाणे( Marathi ukhane For Female) म्हणजेच नाव घेणे पारंपरिक मानले जाते. आणि स्त्रियांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत ५० पेक्षा जास्त उखाणे.

Beautiful mehndi patterns cover the bride’s fingers which she holds over the lehenga

Marathi Ukhane For Female

आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,
……….. रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे.

गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
…….. रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

आईचे वळण, वडिलांचे शिक्षण,
……… राव पती मिळाले हेच माझे भूषण

जडतो तो जीव, लागते ती आस,
…….. रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.

Best Marathi ukhane for female

गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग,
……… रावांच्या संसारात आहे मी दंग.

असंख्य तारे, नभात पहावे निरखून,
……….रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

चंदनासारखे झिजावे, उदबत्तसारखे जळावे,
……….. रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे.

लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
…………रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???

नागपूरची संत्री, जळगावची केळी,
………… रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.

सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता,
…….. चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी

वर्तन असावे साधे, वाणी असावी गोड,
……… रावांच्या जीवनाला माझी जोड

Hands of indian bride and groom intertwined together making authentic wedding ritual

Marathi ukhane for female romantic

आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास,
……..नाव घेते तुमच्यासाठी खास.

दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,
………..राव आले आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.

कपाळाचे कुंकू, जशी चंद्राची कोर,
…………. च्या मदतीवर, सगळा माझा जोर.

शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,
……….. सारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता.

सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ,
……..रावांच्या मांडीवर घेते झोप.

सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,
……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ

लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर ………… रावांशी बांधली, लग्नाची गाठ.

संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.

संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
………..रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.

मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,
…….. रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.

Marathi Ukhane For Female

मराठी उखाणे हा दोहे किंवा लहान कवितांचा एक पारंपारिक प्रकार आहे जो भारतातील मराठी भाषिक प्रदेशांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. उखाणे सामान्यतः विवाहसोहळा, उत्सव आणि इतर आनंदाच्या प्रसंगी लोक किंवा परिस्थितींचा परिचय आणि प्रशंसा करण्याचा मार्ग म्हणून वापरला जातो.

सामान्यतः, मराठी उखाणे मध्ये दोन ओळी असतात, बहुतेक वेळा यमक असतात आणि विनोदी किंवा हुशार विचार व्यक्त करतात. ओळी अशा प्रकारे बनवल्या जातात की पहिली ओळ एखाद्या वाक्यांश किंवा नावाने संपते आणि दुसरी ओळ त्या वाक्यांश किंवा नावाशी संबंधित एक हुशार प्रतिसाद किंवा शब्दप्ले प्रदान करते.

सामाजिक मेळाव्यात उखाणे हा शब्दप्रयोग आणि मनोरंजनाचा एक प्रकार म्हणून वापरला जातो. व्यक्तींची, विशेषत: नवविवाहित जोडप्यांची किंवा जोडप्यांची ओळख करून देणे आणि त्यांचे कौतुक करण्याचा आणि आनंदी वातावरण निर्माण करण्याचा हा एक हलकासा मार्ग आहे. या जोड्यांमध्ये सहसा विनोद, स्तुती आणि आशीर्वाद या घटकांचा समावेश होतो.

मराठी उखाणे हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे, आणि अनेक लोक लग्न, उत्सव आणि इतर उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे पठण आणि देवाणघेवाण करतात. ते या प्रसंगी मजा आणि आनंदाचा घटक जोडतात आणि महाराष्ट्राच्या समृद्ध भाषिक आणि काव्यपरंपरेचे प्रदर्शन करतात.

Why Is Marathi Ukhane For Female important?

Marathi Ukhane is a customary type of couplet or little sonnet that are famous in the Marathi-talking districts of India, especially in Maharashtra. Ukhane is normally utilized during weddings, celebrations, and other upbeat events as a method for presenting and valuing individuals or circumstances.

Regularly, Marathi Ukhane comprises two lines, frequently rhyming and offering a clever or shrewd viewpoint. The lines are built so that the main line closes with an expression or name, and the subsequent line gives a smart reaction or wit related to that expression or name.

Ukhane is utilized as a type of wit and diversion during parties. It is a carefree method for presenting and valuing people, particularly love birds or couples, and to make a good-humored air. These couplets frequently incorporate components of humor, commendation, and gifts.

Marathi Ukhane has turned into a fundamental piece of Marathi culture, and many individuals appreciate discussing and trading them during weddings, celebrations, and other celebratory occasions. They add a component of tomfoolery and satisfaction to the event and grandstand the rich etymological and lovely customs of Maharashtra.

For More Marathi Ukhane Click Me

marathiplus.in

2 thoughts on “स्त्रियांसाठी मराठी उखाणे | Best 50+ Marathi Ukhane For Female

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top